Advertisement

लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित महिलांना ई-केवायसी करण्याची पुन्हा संधी मिळावी या करिता उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे निवेदन* खामगाव/(संतोष आटोळे )

*लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित महिलांना  ई-केवायसी करण्याची पुन्हा संधी मिळावी या करिता उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे निवेदन* 
खामगाव/(संतोष आटोळे )          महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. ई-केवायसी लिस्टमध्ये ज्या महिलांचे नांव नाही त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी मिळावी अशा मागणीचे निवेदन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजितदादा पवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी पाठविले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री 
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून महिलांचे सक्षमीकरण करण्याकरीता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची अट शासनाने लागू केली होती. परंतू अनेक महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना ई-केवायसी बाबत बँकेत विचारणा केली असता तुमची ई-केवायसी झालेली आहे असे सांगण्यात आल्यामुळे त्या महिलांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसी केलेली नाही. तसेच काही महिला गरोदर असल्यामुळे त्या दवाखान्यात भरती होत्या व ग्रामीण भागातील महिला ह्या शेतीकामात व्यस्त होत्या. अशा विविध कारणांमुळे त्यांची ई-केवायसी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली नाही.


महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ओटीपी न येणे किंवा सर्व्हर डाऊन असणे तसेच अनेक कुटूंबे विभक्त असतांना सुध्दा रेशनकार्ड मध्ये एकत्रित नांव आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्याप्रमाणे शासनाने चुक दुरुस्ती करीता पोर्टलमध्ये परत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्याच प्रमाणे ई-केवायसी यादी मध्ये नांवे नसलेल्या महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिलांना भेट म्हणून परत एक संधी देण्यात यावी असेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. सदर 
निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री 
 देवेन्द्र फडवणीस,एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री, मकरंद जाधव पालकमंत्री,
जिल्हाधिकारी,महिला व बालविकास अधिकारी बुलडाणा,उपविभागीय अधिकारी खामगाव, डॉ.बबनराव तायवाडे  अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ  यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments