*सेफ्टी टॅंक मध्ये मृतमुखी गाईला एकनिष्ठा गौ सेवकांनी जेसीबी द्वारे काढले बाहेर*
खामगांव /(संतोष आटोळे ) दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीच्या मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली.
ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंकचे झाकण उघडे नसते तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
0 Comments