*डॉ रावनकार यांची एनसीपी सरचिटणीस पदी नियुक्ती*
खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच वैद्यकीय व्यावसायिक डॉ ज्ञानेश्वर हरिविजय रावणकार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खामगाव तालुका सरचिटणीस पदी जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे, विधानसभा अध्यक्ष श्री धोंडीराम खंडारे, यांचे सूचने नुसार श्री संजय बगाडे तालुका अध्यक्ष खामगाव यांनी रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत सदर नियुक्ती जाहीर करण्यात आली. डॉ रावनकार यांनी शेगाव संग्रामपुर खामगाव परिसरात १० रुपयात उपचार अशा पद्धतीची रुग्ण सेवा केली आहे. या मुळे अनेक रुग्णांना उपचारांसाठी मदत झाली आहे. त्यांनी साधारणतः २००९ पासून अशा प्रकारे रुग्ण सेवा केली आहे. याचा लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला होईल यात शंका नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही नियुक्ती वरिष्ठांच्या विचारात होती. खामगाव नगरपालिका निवडणुकीत डॉ रावनकार यांनी पक्षाचा प्रचार करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या नियुक्तीने पक्षाला शहरात आणि ग्रामीण भागातही फायदा होईल असा अंदाज आहे, डॉ संतोष तायडे, श्री खंडारे साहेब, श्री बगाडे साहेब यांनी ही नियुक्ती केली. या प्रसंगी,श्री संतोष पेसोडे तालुका कार्याध्यक्ष, अमोल बिचारे माजी बांधकाम सभापती, श्री गजानन धंदरे तालुका संघटक आणि अनेक राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments